Jalna Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून काल लाठीचार्ज करण्यात आला. याचे पडसाद राज्यासह राजकीय वर्तुळात उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आज माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनीही दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा सवाल करत ताशेरे ओढले आहेत.
यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, जालण्यात कार्यक्रम करण्यासाठी आंदोलन मोडीत काढण्याचा हा प्रयत्न होता. उपोषणकर्त्यांवर लाठीमार चुकीचंच आहे.आता फक्त चौकशीचा फार्स आहे.पोलीस एवढी कशी मारहाण करु शकतात. दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.यावोळी बोलताना त्यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच कौतुकही केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गणेशोत्सवात विशेष अधिवेशन कशासाठी? देशात हुकमशाह आम्हाला जन्माला येऊ द्यायचा नाही. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर स्वातंत्र्यासाठी जो लढा झाला होता, त्यात अनेकांची कुटुंब भरडली गेली. स्वातंत्र्यसैनिकांच बलिदान दिलं.त्यांच्या सगळ्यांच्या त्यागानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आज जे घराणेशाहीचा उद्घोष सुरु आहे. तुम्हाला सांगायला घराणेच नाही. जे लोक कुटुंबव्यवस्था नाकारतात त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याविषयी बोलू नये.तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही.कारण कुटुंबव्यवस्था, घराणं हीच आमच्या हिंदुंची संस्कृती आहे. तिच्या मुळावरती घाव घालणार. पहिला कुटुंब सांभाळा मग आमच्या घराण्यावरती बोला असा इशाराही उध्दव ठाकरे यांनी दिला.








