Sanjay Raut : तीन महिन्यांपूर्वी ईडीने राऊतांना मनी लॉड्रिंगप्रकरणी अटक केली होती.त्यानंतर एकशे दोन दिवस कोठडी घालवल्यानंतर राऊतांना काल (बुधवारी) जामीन मिळाला आहे. यामुळे ते पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आलेत.जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. दोन दिवसानंतर पक्षासाठी काम करण्यासाठी पुन्हा सक्रिय होणार असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.मातोश्रीच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ येत आदित्य ठाकरे यांनी राऊतांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. (Sanjay Raut Latest News)
यावेळी केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला उद्धव ठाकरे म्हणाले,केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत.न्यायव्यवस्था अंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.न्यायालयाने कालचा दणका केंद्र सरकारला दिला आहे. कदाचित खोट्य़ा केसमध्ये पुन्हा संजय राऊत यांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल केंद्र सरकार संवेदशील असतं तर अशा घटना घडल्या नसत्या. या यंत्रणा सुपारी घेऊन काम करीत असतील तर अशा यंत्रणा बंद केल्या पाहिजे. केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोग करुन देशात पक्ष फोडले जात आहेत.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- Sanjay Raut: संजय राऊतांनी केलं शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक; म्हणाले,मी ईडीवर टीका करणार नाही
“संजय राऊत हे आमच्या कुटुंबातील आहे. ते जेलबाहेर आल्याचा आनंद आहे. संजय यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचा नेते , खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. त्याचबरोबरीनं जिवलग मित्र आहेत. संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. संकटात तो लढतोय. काल कोर्टाने निकाल दिला. न्यायदेवतेचे मी आभार मानतो,”असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








