Raj Thakrey In Kolhapur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूरात आले आहेत. राज ठाकरेंच्या कोल्हापूरातील जंगी स्वागतानंतर त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन कोकण दौऱ्यापुर्वी जाण्यापुर्वी कोल्हापूर दौऱा करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “अंबाबाईचं दर्शन घेऊन कोकणातील दौरा सुरू करतोय. चांगला तांबडा-पांढरा मिळाला तर खाऊन घेईन. कोकणानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. त्यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.”
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, “कोणताही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. बालेकिल्ले कुणाचे हालत नाहीत असं नसतं, इथला बालेकिल्ला देखील हालेल. मी केवळ माझ्या पक्षासाठी काम करतो कुणासाठी काम करत नाही.” शिवसेना आणि वंचीत यांच्या युतीवर बोलण्यास राज ठाकरे यांनी नकार दिला. सीमाभागाचा वादावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “सिमावादाचा प्रश्न आत्ताच कसा बाहेर येतो? बातम्या अचानक कशा बाहेर येतात जत मिळावं मूळ विषय बाहेर येऊ नये यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही.”
“राज्यपालांबद्दल काय बोलायचं मोठ्या पदावर बसले म्हणून काय करायचं कोश्यारी यांना कोण स्क्रिप्ट लिहून देत का हे तपासावे लागेल. उद्धव ठाकरेंनी आरोग्याचं कारण देऊन व्यक्तींना भेटत नव्हते आपले मुख्यमंत्रीपद गेल्या गेल्या सगळे दौरे सुरू झाले”
“कोणत्याही चित्रपटावर आक्षेप असेल तर निर्माता, लेखक यांना बोलवा आणि विचारा न पाहता आक्षेप कसा घेता. तुम्ही काहीही दाखवता म्हणून अनेकजण नको ते बोलतात. माध्यमांनीच ठरवावे कुणाला दाखवायचं आणि कुणाला दाखवायचे नाही. जातीचा अभिमान होता पण दुसऱ्या जातीचा द्वेष नव्हता हे आताच चालू झालं पश्चिम महाराष्ट्रात जास्त चालू झालं”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








