Mumbai News : एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकण हे कोणत्या लोकशाहीत बसत. याचा अर्थ आम्ही वाट्टेल ते करू तुम्ही आवाज नाही उठवायचा.जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू ही पाशवी वृत्ती देशामध्ये फोफावत आहे. आपण वेळेवर एकत्र आलो नाही तर संपूर्ण देश खाऊन टाकेल. तीन दिवसापूर्वी उत्तर भारतीयां सोबत बोलताना मी म्हणालो, त्यावेळची लढाई स्वातंत्र्यासाठी होती. मात्र आताची लढाई स्वातंत्र्य टिकवण्याची आहे. स्वातंत्र्य टिकवायच असेल तर एकत्र या असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. रायगडातील पदाधिऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यानंतर उध्दव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वन्दे मातरमचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धाटन करतायेत.झेंडे दाखवले जात आहेत . घोषणा दिल्या जात आहे. दुसऱ्या बाजूला माझी भारत माता गुलाम कशी होईल या दिशेकडे त्यांची पावली चालली आहेत. ही पावले आपल्याला ओळखून एकत्र यायला पाहिजे. आज रायगडातील पदाधिऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच मी आभार मानतो. शिवसेना, हिंदुत्व काय आहे हे वेगळ सांगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








