Udayanraje : उत्सव काळात डॉल्बी सिस्टीमला परवानगी नसल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितल्यानंतर, जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम (Dolby System) वाजलीच पाहिजे, असं स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केलं. डॉल्बी का नको याचं कारण द्यावं, असा जाब प्रशासनासह पोलिसांना उदयनराजेंनी विचारला आहे.
केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनानं डाॅल्बीला परवानगी का नाही याचं पत्रक काढावं. प्रशासकीय अधिका-यांनी प्रत्येक घटकाचा विचार करुन निर्णय घेतले पाहिजेत. डाॅल्बी वाजलीच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. दोन-तीन तासांनी काय आभाळ कोळसणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उदयनराजे म्हणाले, “साताऱ्यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे. पोलिसांनी (Satara Police) प्रशासनाला डॉल्बी का नको आहे. याचं त्यांनी आम्हाला पहिल्यांदा उत्तर द्यावे. सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवली जावी, याकरिता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा पोलिस प्रशासनाकडं पाठपुरावा केला होता. तेव्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी डॉल्बीला सशर्त परवानगी दिल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. मात्र, नंतर पोलिसांनी यू टर्न घेत डॉल्बीला परवानगी नाहीच, अशी भूमिका मांडली. व्यावसायिकांच्या कुटुंबीयांचा प्रशासनानं एकदा तरी विचार केला पाहिजे. त्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली आहे. डॉल्बीवर बंदी घातल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. सातारा शहरात डॉल्बीला बंदी आणि इतर ठिकाणी डॉल्बी मात्र जोरजोरात वाजते, असा दुटप्पीपणा व्हायला नको.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








