सातारा : राज्यपाल कोशयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दोनदा एकेरी उल्लेख करून आणखी आगीत तेल ओतले आहे. यामुळे शिवसैनिक आणखी आक्रमक झाले आहेत. आधीपासून संतप्त असलेल्या उदयनराजे समर्थकांनी सातारा येथील शिवतीर्थ पोवाईनाका येथे रावसाहेब दानवे विरोधात रान पेटवले आहे.पोलिसांच्या विरोधाला झुगारून दानवेंच्या पुतळ्याचे पोलिसांसमोरच दहन केले.
उदयनराजेंच्या समर्थकांना प्रतिक्षा आहे ती फक्त उदयनराजेंच्या आदेशाची मात्र काही समर्थक मात्र आदेशाची वाट न पहाता आपला संताप व्यक्त करताना दिसत आहे.आज सातारा शहरा नजीक खिंडवाडी गावाच्या हद्दीत उदयनराजे समर्थकांकडून महामार्गावर मोठमोठे टायर पेटवून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,राज्यपाल कोशयारी आणि आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करून महामार्ग रोखला याबाबत शहर पोलीस व वाहतूक विभागास माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पेटलेले टायर बाजूला करून महामार्गावरील थांबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









