प्रतिनिधी,रत्नागिरी
Uday Samant News : राहुल गांधीनी मातोश्रीवर जाणे यात नवीन काहीही राहिलेले नाही.राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली उरलेली शिवसेना आहे हे आता सिध्द झालेय.राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर व्यक्तव्य केले त्याबाबत कोणी काही बोलत नाही.राहुल गांधी ज्याप्रकारे सर्वांचा अपमान करताहेत त्यावर कोणी काही बोलत नाही.आणि राहुल गांधी मातोश्रीवर गेले तरी महाराष्ट्रात फार काही क्रांती घडेल असे मला वाटत नाही,असे मत राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी शहरातील जिल्हा रुग्णालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 138 व्या जयंती निमित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी उदय सामंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. पत्रकारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत विचारेलल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अजित पवारांनी काही ठोस भूमिका महाराष्ट्रासमोर मांडलेल्या आहेत.त्यातील ठोस भूमिका इव्हीएमच्या मुद्यावर आहे. विरोध करताना अशा मुद्यांवर विरोध करा ज्यांची चेष्टा होणार नाही. इव्हीएमच्या माध्यमातून एक माणूस देशात काही चमत्कार घडवू शकत नाही,अशी भूमिका अजित पवार यांनी मांडल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. देवेद्र फडणवीसांना फडतूस संबोधले गेले त्यावरुन अशा पध्दतीचे शब्दप्रयोग राजकारणामध्ये मुख्य लोकांनी करु नयेत,अशी भूमिका अजित पवारांनी मांडल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
पत्रकारांनी रत्नागिरी मतदार संघातून आमदार राजन साळवी यांना उदय सामंत यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे यावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न विचारला असता उदय सामंत म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणालाही कोणाच्याही विरोधात उभे राहण्याचा अधिकार आहे. भविष्यात आदित्य ठाकरेही माझ्या विरोधात उभे राहतील. जो पर्यंत माझ्या सोबत इथला मतदार आहे. तो पर्यंत मला कसलीही भिती नाही. लोकशाहीमध्ये हार जीत असतेच. ती खिलाडीवृत्तीने घेतली पाहिजे असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









