Uday Samant News : एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या 50 जणांचा विश्वास त्यांच्यावर आहे.एकनाथ शिंदे राजीनामा देणार अशी अफवा काहींनी पसरवली होती.आम्ही राजेनामे घेणारे आहोत. 12 महिन्यापूर्वी राजीनामे कसे घेतो हे देशाने पाहिले आहे.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खासदारकीच्या आणि आमदारकीच्या निवडणुका होतील अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमच्या संदर्भातील केस विधानसभा अध्यक्षांसमोर चालावी असे निर्देश आहेत. त्याच निकालाला अनुसरून विधानसभेच्या अध्यक्षांनी नोटीस दिली असेल, आणि सात दिवसांची मुदत दिली असेल तर आम्ही 40 जण त्यांच्यासमोर बाजू मांडू. ज्यापध्दतीने निवडणूक आयोगासमोर, सुप्रिम कोर्टासमोर गेलो त्याचपध्दतीने विधानसभा अध्यक्षांसमोर जाऊ असेही सामंत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित दादांनी महायुतीमध्ये प्रवेश करून कोणाचा पोपट मारलाय हे सिद्ध झाले आहे. जे काय उरले-सुरले आहेत ते टिकावे यासाठी प्रयत्न सुरु आहे.पोपट मारण्याच्या अनेक तारखा देऊन झाल्या आहेत. मात्र पोपट मेला नाही.अजून आठ-दहा दिवसात पोपट कोणाचा मेला आहे हे नक्की कळेल, असा इशारा त्यांनी दिला. भविष्यात आमची जी बाजू आहे ती विधानसभा अध्यक्षांसमोर मांडू. ते कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री असल्याचे सामंत म्हणाले.
शरद पवार देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणात 56 वर्ष काम करत आहेत.त्यामुळे त्यांना मानणारा गट हा नक्कीच महाराष्ट्रात असणार आहे. परंतु अजित पवार यांनी संख्या घेऊन महायुतीसोबत आले आहेत. त्यांनी त्याचं म्हणणं मांडल आहे.राष्ट्रवादीबाबत मी काय बोलण उचित ठरणार नाही. मात्र 12 महिन्यापूर्वी आम्ही जो उठाव केला त्यानंतर अनेक नेत्यांनी आम्ही बाहेर पडणार असल्याचं सांगितलं होत.त्यामुळे शरद पवार वयाच्या 83 व्या वर्षी देखील सांगितलेल्या शब्दाची पुर्तता दोन दिवसात करतात.ही सकारात्मक बाब आहे. त्यांचा चांगला गुण घ्यावा अशी विनंती सामंत यांनी केली.