ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची मंगळावारी (२८ जून) हत्या (Udaipur killing) करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन केले जात आहे. या घटनेनंतर अजमेर दर्गा दिवान जैनुल आबेदिन अली खान (Zainul Abedin Khan) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी भारतातील मुस्लीम देशात तालिबानी मानसिकतेला थारा नाही. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अजमेर दरगाहचे दीवान जैनुल आबेदीन अली खान यांनी या घटनेविरोधात निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोणताच धर्म मानवताविरोधात जात नाही. इस्लाम धर्म शांतीचा संदेश देतो. इंटरनेटवरून समोर आलेल्या व्हिडिओनुसार काही लोकांनी एका गरीब इसमाची क्रूर हत्या केली आहे. इस्लाम धर्मात एखाद्याची हत्या दंडनीय अपराध मानला जातो. आरोपी हे काही कट्टरपंथी समूहाचे समर्थक आहेत. ज्यांना हिंसेतूनच समाधान मिळतं. त्यामुळे आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. भारतातील मुस्लिम लोक आपल्या मातृभूमित कधीच तालिबानी मानसिकतेचं समर्थन करणार नाहीत, असंही अली खान म्हणाले.
राजस्थानमधील उदयपरू येथे शिवणकाम व्यावसायिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय. राजस्थानमध्ये काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींनी या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दरम्यान, अजमेर दर्गा दिवान जैनुल अबेदिन अली खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी भारतातील मुस्लीम देशात तालिबानी मानसिकतेला थारा नाही. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोणताही धर्म मानवतेविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन देत नाही. विशेष करुन इस्लाम शांततेचा पुरस्कार केला जातो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका गरिब माणसावर हल्ला करण्यात आला आहे. इस्लामध्ये हा अपराध आहे,” असे खान यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.









