उचगाव/वार्ताहर
उचगाव ता.करवीर येथील माळीवाडा हायवे पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढिण्यासाठी गेली सहा महिने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व काँग्रेस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करून निवेदने देऊन एक वेळ महामार्गाचे काम बंद पाडले.विविध प्रसारमाध्यमांनी ही यावरती बातम्या दिल्या. तरीसुद्धा या कामाबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही व या कामासाठी कोणतीही मंजुरी मिळाली नाही. या भागातील खासदारांनीही याकडे साफ दुर्लक्ष केले. याचा निषेध करण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी “गेले खासदार कुणीकडे” या आशयाचा फलक माळीवाडा पुलाजवळ शिवसेना व काँग्रेस यांच्या वतीने लावण्यात आला आहे अशी माहिती शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव व लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी दिली.
या फलकाचे अनावरण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी थांबून हा फलक वाचला व प्रशासनाचा निषेध करत आता तरी हायवे प्रशासन व स्थानिक खासदारांना जाग येते का हे पाहूया अशा प्रतिक्रिया दिल्याचेही राजू यादव यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट ) करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, दिनकर पोवार, तालुकाप्रमुख विनोद खोत, दिपक पाटील, दिपक रेडेकर, महेश जाधव, गुरू माने, योगेश लोहार, विक्रम चौगुले, विराग करी, राहुल मोळे, तुषार पाटील,अरविंद शिंदे, संदिप पाटील, श्रीधर कदम, संतोष चौगुले, शरद माळी, विनायक हावळ, बाबुराव पाटील, दिपक पोपटाणी, सुनिल पारपाणी, अजित चव्हाण, अजित पाटील, दशरथ चौगुले, केरबा माने, सोमनाथ तोडकर, भागातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.