उचगाव/प्रतिनिधी
Kolhapur Crime News : उचगाव ता. करवीर येथे कृषी महाविद्यालयाच्या परिसरात गणेश नामदेव संकपाळ ( वय ४० रा. गणेश कॉलनी उचगाव) याचा निर्घुण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार करून सिमेंटच्या पाईपचा तुकडा डोक्यात घालून हा खून करण्यात आला आहे. खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गणेश संकपाळ हा बुधवारी रात्री साडेसात वाजता डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला तो घरी परत आलाच नाही.गणेश हा उचगाव चौकातील ओढ्याच्या जवळील एका फर्निचर दुकानात काम करतो. महामार्ग लगत कृषी महाविद्यालयाच्या आवारात गणेश संकपाळ याचा रक्ताच्या थारोळ्यात माखलेला मृतदेह फिरायला जाणाऱ्या व्यक्तींनी पाहिला.त्यानंतर त्यांनी गांधीनगर पोलिसांना ही घटना कळवली. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला.
दरम्यान, धारदार शस्त्राने गणेशच्या पाठीवर, पोटावर वार करून सिमेंटच्या पाईपच्या तुकडा डोक्यात घालून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले चप्पल व रुमाल सापडला. गणेशच्या हातावर गणेश ,संतोष व सिंहाचे चिन्ह कोरलेले होते यावरून त्याची ओळख पटली. पत्नी आल्यावर हा गणेशच असल्याचे सांगितले.गणेशला दारुचे व्यसन होते.त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा असा परिवार आहे.खूनाचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.गांधीनगर पोलिसांत खूनाचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Previous Articleराहुल गांधीच्या अडचणीत वाढ, सुरत कोर्टानं याचिका फेटाळली
Next Article संगमेश्वर सोनवी पुलावर अपघात









