वार्ताहर/उचगाव
खास दसऱ्यानिमित्त उचगाव येथील प्राथमिक मराठी शाळेच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या उचगाव पँथर बिगबॅश क्रिकेट स्पर्धेत उचगाव टायगर संघाने मराठा स्पोर्ट्स संघाचा पराभव करून पँथर बिगबॅश चषक पटकाविला. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघानी भाग घेतला होता. प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघाचे कर्णधार अबू ताशिलदार तसेच संघातील खेळाडू यश मण्णूरकर, राकेश प्रसाद, साईबाज यासीन, सलीम, श्रीनाथ, मनोज, महेश, प्रथमेश, मंथन, पवन हे सर्व खेळाडू होते. या टायगर संघासाठी प्रवीण देसाई यांनी टी-शर्ट देवून प्रोत्साहित केले. तृतीय क्रमांक रॉयल चॅलेंजर तर चौथा क्रमांक तेरसे सरकार संघाने पटकाविला. बक्षीस वितरण प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बंटी पावशे, जावेद जमादार, बाळासाहेब देसाई, सदानंद पावशे, अमर जाधव, नारायण कांबळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.









