वार्ताहर/उचगाव
येथील उचगाव पॅंथर बिगबाश क्रिकेट स्पर्धेचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्घाटन करण्यात आले व उचगाव प्राथमिक मराठी शाळेच्या क्रीडांगणावरती क्रिकेट स्पर्धाला प्रारंभ करण्यात आले. या उद्घाटनच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतच्या अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. या प्रंसगी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले तर विनोद मेणेसे आणि विनोद लाळगे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.या क्रिकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस बाळकृष्ण तेरसे व मथुरा तेरसे तर ट्रॉफी नारायण कांबळे च्यातर्फे.द्वितीय बक्षीस बंटी पावशे व जावेद जमादार तर ट्रॉफी सचिन तरळेच्या तर्फे, तृतीय बक्षीस मणसे इंडस्ट्रीज शिंनोळी व ट्रॉफी, उत्तेजनार्थ अमर जाधव यांच्यातर्फे बक्षीस व ट्रॉफी,सामनावीर जावेद ताशीलदार ट्रॉफी, मलिकावीर नईम सनदी यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कृताचा उचगाव पॅंथर बिगबाशतर्फे सत्कार करण्यात आला.









