वार्ताहर/उचगाव
सार्वजनिक शिक्षण खाते तालुका रेंज बेळगाव गोजगे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलच्या क्रीडांगणावर उचगाव विभागीय माध्यमिक विभागाच्या क्रीडा यांच्या विद्यमाने माध्यमिक विभागातील उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य ज्योतिबा बेळगावकर हे होते.गोजगे हायस्कुल मैदानावर आयोजित स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मृणाल हेब्बाळकर तालुका आर. एम. चौगुले विनय कदम, शंकर सुतार, उमेश बामणे, एन. ओ. चौगुले, एन. के. कालकुंद्री यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रारंभी ध्वजारोहण उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे व बाळकृष्ण तेरस, रोटरी क्लब सदस्य डी. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा ज्योतीचे स्वागत राहुल होनगेकर, मृणाल हेब्बाळकर, आर.एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा साहित्याचे पूजन भरतेश पाटील, निलेश पाटील यांनी केले.क्रीडांगण पूजन मोहन होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती फोटो पूजन रेश्मा कणबरकर, सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन नूतन पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील प्रतिमेचे पूजन चेतन पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मनोहर बेळगावकर, महात्मा ज्योतिबा फुले फोटोचे पूजन अक्षय भोगण, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जे. एस. पाटील, मंडोळी हायस्कूलच्या शिक्षिका एस एस मुरकुटे तसेच रणजित कणबरकर यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या उद्घाटन समारंभाला आंबेवाडी, गोजगा ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य तसेच शाळा सुधारणा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक जे. बी. मुतकेकर यांनी केले.









