क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगुंदी येथील सेंट पॉल्स इंग्रजी माध्यम शाळा आयोजित उचगांव, बेळगुंदी, मण्णूर, हिंडलगा विभागीय प्राथमिक क्रीडा स्पर्धांना मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या बेळगुंदी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा हेमा सुभाष हदगल, सेंट पॉल्स शाळेचे मुख्याध्यापक फादर रमेश फर्नांडिस, शिक्षण संयोजक ए. डी. कांबळे, सीआरपी सुवर्णा रेडेकर, मुख्याध्यापिका एस. पी. गोळे, उचगांवचे एमएसएफएस फादर ऍनड्रीव, हणमंत गोडसे, मारुती नागण्णावर, बी.आर. बजंत्री, एम. पी कणगुटकर, सीआरपी कीर्ती पाटील, सतीश पाटील, पी. एम. पन्हाळकर, पी. एम. राजपुत, क्रीडाशिक्षक रितेश जाधव, रविंद्र कुंडेकर उपस्थित होते.
प्रारंभी फादर रमेश फर्नांडिस यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर सेंट पॉल्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी शानदार पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण, सरस्वती फोटो व क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले. शालेय क्रीडापटू अथर्व हुलजी, रोहन गोडसे यांनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली. यानंतर उपस्थित पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषण केले.
याप्रसंगीच्या विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच बेळगुंदी केंद्राच्या सीआरपी सुवर्णा रेडेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उचगाव विभागातील क्रीडा शिक्षक व सहशिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सोज तर माधुरी पाटील हिने आभार मानले.