सागरी टेहळणीसाठी तैनात होणार : ‘दृष्टी 10 स्टारलायनर युएव्ही’ची अदानी समूहाकडून निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, हैदराबाद
अदानी समूहाच्या कंपनीने भारतीय नौदलासाठी स्वदेशी ड्रोन बनवले आहे. या स्वदेशी ड्रोनला ‘युएव्ही दृष्टी-10’ असे नाव देण्यात आले आहे. हे स्टारलायनर ड्रोन असून ते बुधवारी अदानी डिफेन्स आणि एरोस्पेसने भारतीय नौदलाला सुपूर्द केले. या स्वदेशी ड्रोनच्या समावेशानंतर भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हे ड्रोन खूपच प्रगत आहे. बुधवारी हैदराबादमध्ये एका फ्लॅगऑफ कार्यक्रमात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत ड्रोनचे अनावरण करण्यात आले.
हैदराबादमधील फ्लॅगऑफ कार्यक्रमात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी भारतीय नौदलाच्या गरजांसह त्यांचा कार्यसहभाग निश्चित केला. संरक्षण क्षेत्रात सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेला चालना दिल्याबद्दल त्यांनी अदानी समूहाचे कौतुक केले. आयएसआर तंत्रज्ञान आणि सागरी वर्चस्वात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे नौदल प्रमुखांनी सांगितले. अदानी समूहाने केवळ उत्पादनच नव्हे तर ड्रोनची देखभाल आणि दुऊस्तीसाठीही मदत केली आहे. नौदलाच्या ऑपरेशन्समध्ये दृष्टी-10 सागरी क्षेत्रावर पाळत ठेवण्यास मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नौदलाची सेवा केल्याचा अभिमान : अदानी
अदानी एंटरप्रायझेसचे जीत अदानी यांनी अलीकडील भू-राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर बुद्धिमत्ता, पाळत ठेवणे आणि टेहळणी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या महत्त्वावर भर दिला. माहितीच्या प्रभावी प्रसारासाठी गुप्तचर यंत्रणा, उत्तम संवाद, ड्रोनसारखे मानवरहित तंत्रज्ञान आणि सायबर तंत्रज्ञानाची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतीय सुरक्षा दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भारताला जागतिक निर्यातदार म्हणून स्थान देण्यासाठी सीमेवर तैनात असलेल्या तीन सेवा आणि सुरक्षा दलांसाठी गुप्तचर आणि पाळत ठेवण्यासाठी व्यासपीठ विकसित करण्यास प्राधान्य देत आहोत. भारतीय नौदलाची सेवा आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
युएव्ही दृष्टी-10 ड्रोनची वैशिष्ट्यो…
युएव्ही ड्रोन हे प्रगत बुद्धिमत्ता, पाळत ठेवणे आणि टेहळणी करणारे साधन
हैदराबादमधून पोरबंदरपर्यंत उ•ाण केल्यानंतर नौदलाच्या ताफ्यात समावेश
दृष्टी-10 स्टारलायनर ड्रोन तब्बल 36 तास उ•ाण करण्यास सक्षम असणार
एकावेळी 450 किलो वजन उचलण्याची क्षमता, एऊAऱ्उ 4671 प्रमाणित
कोणत्याही बदलत्या हवामानात आणि परिस्थितीत उ•ाण करण्याची क्षमता









