वृत्तसंस्था / नवी दिल्ली
29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान शारजाह येथे होणाऱ्या आफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्धच्या आगामी त्रिकोणीय टी-20 मालिकेत मुहम्मद वसीम युएईचे नेतृत्व करेल. ईएसपीएनकिग्रकइन्फोनुसार 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणाऱ्यापुरुषांच्या टी-20 आशिया कपसाठी ही मालिका महत्त्वाची तयारी म्हणून काम करेल.
यावेळी हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीक, मुहम्मद फारुख आणि मुहम्मद जवादुल्लाह या चार खेळाडूंना संघात समाविष्ट करण्यात आले आहे तर अकिफ राजा, मतिउल्लाह खान आणि झुहैब झुबैर यांना संघातून वगळण्यात आले आहे. 28 वर्षीय डावखुला मधल्या फळीतील फलंदाज आणि अर्धवेळ डावखुरा फिरकी गोलंदाज कौशिकने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. तर सिद्दीक, फारुख आणि जवादुल्लाह यांनी त्यांच्या राष्ट्रीय संघाकडून खेळले आहे. 32 वर्षीय मध्यमगती गोलंदाज सिद्दीक गेल्या काही वर्षांपासून युएईच्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने 59 एकदिवशीय आणि 71 टी-20 सामने खले आहेत आणि अनुक्रमे 76 आणि 96 बळी घेतले आहेत. या शिवाय इंटरनॅशनल लीगटी-20 (आयएल टी-20) आणि ग्लोबल टी-20 कॅनडा सारख्या लीगमध्येही त्याने कामगिरी केली आहे. 26 वर्षीय डावखुरा जलदगती गोलंदाज जवादुल्लाह 12 एकदिवशीय सामन्यांमध्ये 11 बळी आणि 33 टी-20 सामन्यांत 54 बळींसह युएईच्या गोलंदाजी हल्ल्यात नियमित सहभागी आहे तर 32 वर्षीय लेग स्पिनिंग अष्टपैलु फारुखने आठ टी-20 सामने खेले आहेत आणि दोन एकदिवशीय सामनेही खेळले आहेत.
युएईचा टी-20 तिरंगी मालिका संघ: मुहम्मद वसीम (कर्णधार), आलिशान शराफू, आर्यनश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पराशर, एथन डिसूझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीक, मुहम्मद फारुख, मुहम्मद जवादुल्ला, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा, साहब खान, रोहिद खान.









