वृत्तसंस्था/दुबई
संयुक्त अरब अमिरातमध्ये 9 सप्टेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी गुरूवारी यजमान संयुक्त अरब अमिरातची घोषणा करण्यात आली. 17 सदस्यांच्या या संघात वेगवान गोलंदाज मतीउल्ला खान आणि फिरकी गोलंदाज सिमरनजित सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या शारजाहमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत खेळणाऱ्या संयुक्त अरब अमिरात संघातील बरेच खेळाडू आशिया चषकासाठी कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये केवळ मतीउल्ला खान आणि सिमरनजित सिंग हे दोन बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरात संघाचे नेतृत्व सलामीचा फलंदाज मोहम्मद वासीमकडे सोपविण्यात आले आहे. 9 सप्टेंबर रोजी अबूधाबीत या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. संयुक्त अरब अमिरात संघाला सध्या भारताचा माजी क्रिकेटपटू लालचंद रजपूतचे मार्गदर्शन लाभत आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी अ गटात संयुक्त अरब अमिरात, भारत, पाकिस्तान आणि ओमान यांचा समावेश आहे.
युएई संघ :
मोहम्मद वासीम (कर्णधार), अलिशान शेराफु, आर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पराशर, इथेन डिसोझा, हैदरअली, हर्षित कौशिक, जुनेद सिद्दिकी, मतिउल्ला खान, मोहम्मद फरुक, मोहम्मद जेवादुल्ला, मोहम्मद झोयेब, राहुल चोप्रा, रोहीद खान, सिमरनजित सिंग आणि शांघिर खान.









