वृत्तसंस्था / मुंबई
प्रो कबड्डी लीग स्पर्धेमध्ये अव्वल समजल्या जाणाऱ्या यु मुम्बा संघाने कबड्डीया क्रीडा प्रकाराचा विकास पुढील युवा पिढीसाठी साधण्याकरिता युवा कबड्डीपटूंचा संघ तयार करणार असल्याची योजना आखली आहे.
भारतीय कबड्डीला भविष्य काळात चांगलाच प्रतिसाद मिळेल, या हेतुने या खेळाची आवड युवांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. भारतीय कबड्डी क्षेत्राचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारण्यासाठी यु मुम्बाने नेहमीच युवा कबड्डीपटूंना प्रोत्साहन दिले आहे. आता यु मुम्बा कबड्डी संघामध्ये 18 ते 23 वर्षे वयोगटातील युवा कबड्डीपटूंना संधी देण्याची योजना या संघाच्या फ्रांचायझींनी आखली आहे. हरिद्वारमध्ये 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या युवा कबड्डी सिरीज ऑल स्टार चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी यु मुम्बा संघाने युवा कब•ाrपटुंचा संघ उतरविण्याचे ठरविले आहे. या युवा कबड्डी संघासाठी राकेशकुमार यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यु मुम्बा संघाचे सीईओ सुहेल चांडोक यांनी येथे शनिवारी आयोजिलेल्या एका समारंभात ही घोषणा केली आहे. यु मुम्बा संघाने आतापर्यंत अर्जुन देस्वाल, सिद्धार्थ देसाई, फजल अत्राचेली, मोहीत, सुरिंदर, रिशांक देवडीगा या सारखे कबड्डीपटू भारताला उपलब्ध करुन दिले आहेत.









