वृत्तसंस्था / आर्लिंग्टन (अमेरिका)
जागतिक मुष्टीयुद्ध क्षेत्रातील प्रख्यात मुष्टीयोद्धा माईक टायसन आणि जॅक पॉल यांच्यात शुक्रवारी रात्री उशीरा डल्लासच्या स्टेडियममध्ये लढत आयोजित केली होती.या लढतीत 27 वर्षीय पॉलने माईक टायसनचा पराभव केला.
या लढतीमध्ये जॅक पॉलला एका पंचाने 80-72 अशा गुणाने विजयी घोषित केले तर दुसऱ्या एका पंचाने पॉलला 79-73 असे विजयी केले. टायसन आणि पॉल यांच्याकडून जबरदस्त ठोशांचे दर्शन घडले. पण पॉलच्या आक्रमक ठोशांसमोर टायसनला हार पत्करावी लागली. 2005 नंतर 58 वर्षीय टायसनची ही पहिलीच लढत होती. जागतिक मुष्टीयुद्ध क्षेत्रामध्ये माईक टायसनने अनेक अव्वल मुष्टीयोद्धांना पराभूत करुन विश्व विजेतेपद राखले होते.









