प्रतिनिधी/ बेळगाव
ऑटोनगर परिसरात गांजा विकणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. माळमारुती पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 460 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
राजेसाब अब्दुलकादर मकानदार (वय 28) रा. खंजर गल्ली, नियाजअहमद निसारअहमद शहापुरी (वय 28) रा. न्यू गांधीनगर अशी त्यांची नावे आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी ऑटोनगर परिसरात या दोघा जणांना अटक केली आहे.
ऑटोनगर येथे गांजा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी राजेसाब व नियाजअहमद या दोघा जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ सुमारे 3 हजार रुपये किमतीचा 460 ग्रॅम गांजा, 450 रुपये रोख रक्कम आढळून आली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.









