प्रतिनिधी/ बेळगाव
दोन मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन गुरुवारी रात्री वैभवनगर येथे झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी एक जखमी झाला आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
संतोष लवू पाटील (वय 21), मूळचा राहणार संकनवाडी, ता. चिकोडी, सध्या रा. कंग्राळी बुद्रुक, उजेफ गुलाब सय्यद, रा. वैभवनगर अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. हर्षा अशोक पाटील (वय 21) रा. काकती हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वैभवनगर येथे ही घटना घडली. संतोष व हर्षा एका मोटारसायकलवरून जात होते. तर उजेफ हा दुसऱ्या मोटारसायकलवरून जात होता.









