मालवण पोलिसांची कारवाई
मालवण / प्रतिनिधी
मालवण पोलिसांनी गुरुवारी पहाटे कुंभारमाठ याठिकाणी अठरा ग्रॅम गांज्यासह दोघा युवकांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पहाटेच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने केली आहे.दोन्ही युवक मुंबईहून मालवण येथे येत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही युवक मालवण शहरातील असल्याचे समजते.









