लोणावळयातील प्रिछलीहिल भागातील एका बंगल्याच्या स्विमिंगपूलमध्ये पडून दोन वर्षीय बालिकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9.15 च्या सुमारास घडली. मागील सहा महिन्यातील अशाप्रकारची ही तिसरी घटना आहे.
हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद (वय 2 वर्षे) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मदनदिम सैयद हे घरातील सदस्यांसोबत कार्निवल विला बंगलो, प्रिचलीहिल येथे आज सकाळी नाष्टा करत असताना घराबाहेर असलेल्या स्विमिंगपूलमध्ये हानियाझैरा पडली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच घरातील लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढून संजीवनी हॉस्पीटल लोणावळायेथे आणले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मयत घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक मुजावर अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : मनसे नेते वसंत मोरे पुन्हा नाराज?








