Satara Crime News : सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक अजंठा चौक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दोघेजण संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दुचाकी व बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. प्रल्हाद शिवाजी पवार(वय 23, रा. अजंठा चौक गोपाळवस्ती सातारा), शिवाजी मल्हारी बुटे(वय 38, रा.अजंठा चौक) अशी त्या दोघांची नावे असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा एेवज हस्तगत केला आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक अजंठा चौक परिसरात (दि.8) रोजी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दुचाकी चोरीतील सराईत युवक हा दुचाकीवरून संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. त्यास डीबी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत विचारणा केल्याबद्दल त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी ही वाढे येथील चोरीची असल्याचे सांगण्यात आले. तालुका पोलिसांकडून त्याबाबत माहिती घेतली असता गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. सराईत दुचाकी चोरटा असल्याने त्याची अधिक चौकशी पोलिसांनी केली असता सेव्हन स्टार येथून ही एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने साथीदाराच्या मदतीने ट्रकच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे सांगितले .त्या देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना.सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









