चार दुचाकी कोल्हापूरातून जप्त
पणजी ; गोव्यात दुचाकी चोरून त्या कोल्हापूरात विकणाऱ्या संशयिताला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चोरलेल्या चार दुचाकी कोल्हापूर येथून जप्त केल्या आहेत. अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांनी दिली आहे. संशयित चोरलेल्या दुचाकींचा रंग व नंबरप्लेट बदलून, बनावट कागपत्रे तयार करायचा व नंतर त्या हजारो ऊपयांना कोल्हापूरात विकत होता. जप्त केलेल्या चार दुचाकी पैकी तीन दुचाकी त्याने 70 हजार ऊपये एक, प्रमाणे विकल्या होत्या. तर एक दुचाकी त्याच्या घरी होती त्याच रंग बदलण्याचे काम सुऊ होते असेही वालसन म्हणाले. अटक केलेल्या संशयिताचे नाव सद्दाम खल्बूद्दीन जमादार (32 कोल्हापूर महाराष्ट्रा) असे आहे. त्याच्या विरोधात भादंसं 379 व 511 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयिताच्या विरोधात सचीन सुभाष उजगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. संशयित गुऊवारी 6 जूलै रोजी पाटो येथील सचीन उजगावकर यांच्या कार्यालयात आला आणि त्यांनी भाड्याने दुचाकी हवी असल्याची मागणी केली. त्याला निळ्या रंगाची दुचाकी दाखविण्यात आली मात्र त्याने पाढंऱ्या रंगाची नवी 6जी दुचाकीची मागणी केली होती. त्यानुसार त्याला ती दुचाकी देण्यात आली. त्याचवेळी सचिन उजगावकर यांना त्याचा संशय आला. कारण यापूर्वी दुचाकी चोरण्याचे अनेक प्रकार गोव्यात झाले होते. पोलिसांना ओळख पटली होती.
पणजी पोलीस स्थानकात संशdियाताच्या विरोधात तक्रार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयिताचा फोटो काढून दुचाकी चोरट्याचा फोटो जे दुचाकी भाड्याने देतात त्या सर्वाना देऊन योग्यती कल्पना देण्यात आली होती. सचिनने पोलिसांनी दिलेला फोटा पाहीला तर तोच माणून दुचाकी घेऊन गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने पोलिसांना कळविले आणि दुचाकी घेऊन गेलेल्याचा पाठलाग करणे सुऊ केले. संशdियात दुचाकी घेऊन पळण्याचा प्रयत्न करीत असतानाच काही अंतरावर जाऊन तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली तेवड्यात पोलीस त्या ठाकाणी पोचले. संशयिताला ताब्यात घेतले. संशdियाताची कसून उलट तपासणी केली असता त्यांनी कुठून दुचाकी चोरल्या होत्या आणि त्या कशाप्रकरे आणि कुणाला विकल्या आहेत त्याबाब माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापूर येथे जाऊन दुचाकी ताब्यात घेतल्या. संशयित पर्यटक म्हणून गोव्यात यायचा आणि बनावट आधारकार्डावर, म्हणजे आधारकार्डावर फोटो संशयिताचाच असायचा मात्र पत्ता नाव व इतर माहिती बनावट असायची. त्या बनावट आधरकार्डच्या आधारे तो दुचाकी भाड्याने घ्यायचा आणि दुचाकीसह पोबारा करायचा. दुचाकी चोरून नंतर त्या विकायच्या हाच त्याचा व्यवसाय बनला होता.









