सातारा :
सातारा शहरातील पंताचा गोट व तालुक्यातील जिहे गावातून दोन अज्ञात इसमांनी दुचाकी चोरून नेल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार १७ रोजी पंताचा गोट येथील अनिकेत विजय बैताडे (वय ३५) याने त्याची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी घराबाहेर पार्क केली होती. ती अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी त्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत. मंगळवार २५ रोजी जिहे (ता. सातारा) येथील जिव्हाळा कार्यालयाच्या पार्किंगमध्ये अनंत संपत यादव (वय ५२) यांनी २० हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क केली होती. ती अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी अनंत याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार राऊत करत आहेत.








