सांगली :
सांगलीवाडी येथील रस्त्यावरील बैलगाडी बघण्यासाठी आलेल्या समडोळी शर्यती अमर आप्पासाहेब धनगर (रा. कोथळी, ता. शिरोळ) याची दुचाकी चोरट्याने लंपास केली. याबाबत त्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सांगलीवाडीतील मिठारगी पट्टा येथे ८ एप्रिल रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. अमर धनगर आणि मित्र सागर पुजारी हे दोघेजण दुचाकी (एमएच ०९ एफसी २७७८) वरून शर्यत बघण्यासाठी आले होते. बैलगाडी शर्यत संपल्यानंतर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दुचाकी लावलेल्या ठिकाणी दोघेजण आले. तेव्हा दुचाकी आढळली नाही. त्यामुळे दोघांनी मित्रांच्या मदतीने सर्वत्र दुचाकीचा शोध घेऊनही ती आढळली नाही. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली








