सावंतवाडी –
सावंतवाडी शहरातून एक महिन्यापूर्वी चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा छडा लावण्यास सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. चोरीतील मोटरसायकलसह आरोपी विनोद मधुकर राऊळ (वय 28 )सध्या रा- झिरंग ,सावंतवाडी, मूळ राहणार वेर्ले -तळेवाडी याला 13 जुलै रोजी अटक करण्यात आली. सावंतवाडी जुना बाजार येथे बिल्डिंगच्या पार्किंगमधून 12 ते 14 जून या कालावधीत मोटारसायकल चोरीस गेली होती. याबाबतची तक्रार श्रीराम कानसे यांनी पोलिसात दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 15 हजारच्या जामिनावर मुक्तता केली आहे .









