रत्नागिरी :
तालुक्यातील नाखरे–पावस रस्त्यावरील खांबडवाडी येथे इको कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल़ा ही घटना बुधवारी दुपारी 2.15 च्या सुमारास घडल़ी चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर (29, ऱा उंबरवाडी–नाखरे, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आह़े अपघातात इको कारचालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े
चंद्रवदन हा 26 मार्च रोजी दुपारी आपली ओला दुचाकी (एमएच 08 बीजी 2916) घेऊन पावस येथे गेला होत़ा पावस येथील आपले काम आटपून चंद्रवदन हा आपल्या उंबरवाडी येथील घरी येण्यासाठी निघाला होत़ा दुपारी 2.15 च्या सुमारास चंद्रवदन हा खांबडवाडी येथे आला असता नाखरे ते पावस जाणाऱ्या इको कारने (एमएच 47 एबी 2194) समोरून त्याला जोराची धडक दिल़ी या अपघातात चंद्रवदन याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाल़ा तर इको कारचालक अनिकेत अविनाश खाके (28,ऱा नाखरे) यालाही दुखापत झाल़ी
- पूर्णगड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी
नाखरे गावचे पोलीस पाटील हे रिक्षा प्रवासी पोहचवून खांबडवाडी रस्त्याने परत येत असताना त्यांना अपघातग्रस्त वाहने दिसल़ी पोलीस पाटील यांनी यावेळी रिक्षा तातडीने एका बाजूला थांबवून अपघाताची खबर गावचे सरपंच, चंद्रवदन याचे नातेवाईक व पूर्णगड पोलिसांना दिल़ी त्यानुसार पूर्णगड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े
- मृतदेह पाहून पत्नीला बसला जबर धक्का
वकिलीचे शिक्षण घेतलेल्या चंद्रवदन याचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होत़े पत्नी व कुटुंबियांसोबत तो नाखरे उंबरवाडी येथील आपल्या घरी वास्तव्य करत होत़ा अपघाताची माहिती मिळताच चंद्रवदन याची पत्नी, वडील हे तातडीने घटनास्थळी दाखल झाल़े अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चंद्रवदन याचा मृतदेह पाहून पत्नी व चंद्रवदन याच्या वडिलांना जबर धक्का बसल़ा
- जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी
अपघातानंतर चंद्रवदन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा ऊग्णालय येथे आणण्यात आल़ा अपघाताची माहिती मिळताच मोठी गर्दी जिल्हा ऊग्णालयात दिसून आल़ी अपघातात चंद्रवदन याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच चंद्रवदन याचे नातेवाईकही ऊग्णालयात दाखल झाले होत़े
- कारचालक उपचारासाठी खासगी रुग्णालयात
इको कारचालक अनिकेत खाके हा नाखरे गावचा रहिवासी असून तो बुधवारी दुपारी तो इको कार घेवून नाखरे ते पावस असा जात होत़ा अपघातानंतर खाके यालाही दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी ऊग्णालयात दाखल करण्यात आल़े त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
- एक महिन्यापूर्वी झाले होते लग्न
चंद्रवदन याचे फेब्रुवारी 2025 मध्ये लग्न झाले हेत़े मोठ्या थाटात चंद्रवदन याचा लग्नसोहळा पार पडला होत़ा नुकत्याच झालेल्या लग्नामुळे शिंदे दसुरकर यांच्या घरी आनंदाचे वातावरण होत़े असे सर्व काही आनंदात सुऊ असताना अशी दुर्घटना घडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.








