प्रतिनिधी /म्हापसा
शेळप धुळेर म्हापसा येथे असलेल्या प्रभाकर वेर्णेकर यांच्या गॅरेजमध्ये चार्चिंगला लावलेली इलेक्ट्रीक दुचाकी (जीए 03 एई 5452) शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली लिडिंग फायरमन आनंद नाईक, जयेश कांदोळकर, अर्जुन धावस्कर, अमोल सातार्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. मात्र तोपर्यंत सदर दुचाकी जळून खाक झाली होती.









