तुरंबे वार्ताहर
देवगड निपाणी राज्य मार्गावर गैबी नाक्याजवळ मोटर सायकलस्वाराला भरधाव ट्रक चालकाने जोराची धडक दिल्याने शिंदेवाडी तालुका मिरज येथील हरिश्चंद्र भास्कर रणदिवे या 27 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिरजहुन सकाळी बाळूमामाचे दर्शन घेऊन सर्वजण धरण बघण्यासाठी चालले होते वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. घटनेची नोंद राधानागरी पोलिसात झाली आहे .या मार्गावरील भरधाव वाहने चालवण्याच्या वर कठोर कारवाई अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
शिंदेवाडी तालुका मिरज येथील हरिश्चंद्र भास्कर रणदिवे आणि त्याचे आठ मित्र सकाळी मिरज हुन बाळूमामाच्या दर्शनाला आले होते . दुपारी बाळूमामाचे दर्शन घेऊन राधानगरीकडे चालले होते. यातील सात मित्र गैबी नका येथे थांबले तर हरिश्चंद्र भास्कर रणदिवे आणि महेश रणदिवे हे दोघे लघुशंकेसाठी हनुमान मंदिर शेजारी थांबले होते. याच दरम्यान राधानगरिकडून चिरा घेऊन एक ट्रक मुधाळ तिटा कडे भरधाव वेगाने जाताना त्याने थांबलेल्या मोटरसायकल स्वरांना जोराची धडक दिली यामध्ये हरिश्चंद्र रणदिवे जागीच ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.
हे दोघे रस्त्यावरच पडले असताना ट्रक चालत पुन्हा भरतधाव वेगाने सुमारे तीनशे मीटर अंतरावर पळून गेला पोलिस आणि प्रवाशांनी त्याचा पाठलाग करून गैबी घाटातील धबधब्याजवळ ट्रक चालकाला थांबवले. अपघात एवढा भीषण होता की अपघाताचा आवाज ऐकून शेतातील शेतकरी रस्त्यावर धावून आलेत तर घटनास्थळी मास आणि रक्ताचे थारोळे पसरले होते. विखुरलेले मास पाहून अनेकांना धक्काच बसला. तर ट्रक चालक नशेत असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. अशा चालकांच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी घटनास्थळी प्रवाशी वर्गातून होत होती.
राऊतवाडी धबधबा सुरू झाल्यापासून या मार्गावर भरधाव वेगाने वाहने जाताना दिसतात त्यांच्यावर वेगाची मर्यादा आणावी आणि मद्यप्राशन करून वाहन चालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस उपनिरीक्षक एन. ए. खान, पी. डी. गुरव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. मात्र तब्बल साडेतीन तास शववाहीका मिळाली नसल्याने मृतदेह रस्त्यावरच पडून होता. तालुक्यात तीन धरणे दाजीपूर अभयारण्य अशी पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी शववाहीका असणे गरजेचे असताना आपत्ती व्यवस्थापनाने अशी कोणतीच सोय केली नाही.









