प्रतिनिधी,रत्नागिरी
रत्नागिरी : पावस मार्गावर दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघात एका तरुणाचा मृत्यू झाला. स्मितेश दिलीप जोशी (28, काळबादेवी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघाताता अन्य दोघेजण गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हि घटना रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास घडली स्मितेश जोशी आणि प्रसाद राऊळ (25, काळबादेवी दोघे दुचाकीवरुन पावसहून रत्नागिरीच्या दिशेने येत होते. हे दोघे फिनोलेक्स फाटा येथे आले असताना रत्नागिरीहून पावसच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत स्मितेश जोशी जागीच मृत झाला. त्याच्या मागे बसलेला प्रसाद राऊळ हा गंभीर जखमी झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील बासीन भट्टीवाले हाही गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Previous Articleशेअर बाजारात आज एक तास मुहूर्त ट्रेडिंग
Next Article माझ्याशी गद्दारी केली; शेतकऱ्यांशी करू नका









