फलटण :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांना विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने दुर्दैवाने दोघांचाही वैद्यकीय उपचारापुर्वीच मृत्यू झाला.
तुषार रामेश्वर बावनकुळे (वय 22, रा. खलासना नागपूर), मधुकरराव तुकारामजी शेंडे (वय 55, रा. मेडीकल चौक नागपूर) अशी मयत झालेल्याची नांवे आहेत. पालखी वारी जात असताना राजुरी (ता. फलटण) येथील टोलनाका नजीक घटना घडली. दोन्ही वारकऱ्यांना विजेचा धक्का लागल्याने दोघांनाही तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी नातेपुते (जि. सोलापूर) येथील ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र, त्यांना उपचारापुर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
दोन्ही मयत वारकऱ्यांना नागपूर येथे नेण्यात येणार असून तेथेच अंत्यसंस्कार येणार करणार असल्याचे स्थानिक नागरिकांकडुन समजते. फलटण बरड पोलीस ठाणे यांच्याकडुन माहिती मिळाली नसली तरी नातेपुते पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली असल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजते.








