केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपादभाऊ नाईक यांची माहिती
पणजी : राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिह्यात मिळून सुमारे 15000 सोलर पथदीप बसवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. दोन्ही जिह्यांमध्ये प्रत्येकी एक गाव दत्तक घेऊन तो सौरऊर्जा पुरवून सौरगाव करण्याचे उद्दिष्ट आहे. हे सर्व प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गोवा राज्यातील विविध भागात सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. गोव्याला सौरऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग कऊन देण्यात येईल, अशी हमी नाईक यांनी दिली.









