कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुण्यातून एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. आज सायंकाळपर्यंत दोन पथक कोल्हापुरात दाखल होणार आहे. दरम्यान ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा असल्याने जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं चित्र आहे. (फोटो संग्रहित )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेत संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ पथक सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र झपाट्याने पाणीपाती वाढत असल्याने,आज पुण्यातून एनडीआरएफ चे दोन पथक कोल्हापूर साठी रवाना झाले आहे.