वाई : पुणे सातारा महामार्गावर आज सकाळी वाहनांची नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. खंबाटकी घाटात आज (सोमवार) सकाळी घाट ओलांडून सातारा कडे येत असताना तीव्र उतारावर दोन ट्रक एकमेकाला धडकून रस्त्यावर पडल्याने घाट रस्त्यावरील वाहतुक कोंडी झाली होती.
पोलिसांना ही माहिती मिळताच भुईंज (ता वाई) सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खंबाटकी घाटात झालेल्या अपघातात दोन्ही ट्रक पलटी झाले आहेत. एक ट्रक रस्त्यावरच आडवा पडल्याने घाटातील वाहतुक खोळंबली. या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाले आहेत. वेळे ग्रामस्थ व क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे या रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









