राय : हुजरा -राय येथे बुधवारी सकाळी शिरोड्याहून मडगावला जाणाऱ्या एका मिनीबसची धडक बसल्यामुळे दोन विद्यार्थ्यासह तिघेजण जखमी झाले, पैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्राप्त माहितीनुसार राय मैदानावर दोन विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सरावाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. खेळ संपल्यानंतर लोटली येथील विद्यार्थ्याचा गट लोटलीला जाण्यास निघला. हुजरो -राय येथे चार रस्ते आहे. राय बाजूने थांबलेल्यांना लोटलीला जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडण्यासाठी काही विद्यार्थी वाहनांची रहदारी संपेल म्हणून वाट पाहात होते. वाहतूक थोडी झाल्याचे पाहून एक दुचाकीस्वार वाहनासह रस्ता ओलांडू लागला. ही दुचाकी लोटली येथील मार्कूस फर्नांडिस (43) चालवत होता तर लोटली येथील दोन विद्यार्थी या दुचाकीवर बसले होते. एकाचे नाव मिलरॉय फर्नांडिस (13) तर दुसऱ्याचे नाव ब्रॅण्डा फर्नाडिस (12) होते. दुचाकी रस्ता ओलांडत असतानाच शिरोड्याहून येत असलेल्या मिनीबसने या दुचाकीला ठोकरले आणि दुचाकीवर असलेले तिघेही जखमी झाले. हा अपघात डोळ्यांनी पाहताच लोटलीच्या विद्यार्थ्याच्या घोळक्याने एकच आरडा ओरड केली. काही वेळानंतर जखमींना मडगावच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आले. मात्र एकाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला बांबोळी येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आलेले असून तेथे त्या विद्यार्थ्यावर उपचार चालू आहेत अशी माहिती मायणा -कुडतरी पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मायणा -कुडतरी पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी पंचनामा व इतर पोलिसी सोपस्कार पूर्ण केले. शिरोडा -मडगाव मार्गावर धावणारी जीए-04-टी-1481 क्रमांकाची मिनीबस पोलीस स्थानकाकडे आणून ठेवण्यात आली आहे.
आर्लेम- आंबोरा रस्ता ‘किलर रोड’
आर्लेम- आंबोरा या अंदाजे 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला ‘किलर रोड’ म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेक जणांची जीव घेतलेले असून आणखी किती जणांची जीव घेण्याची वाट हा रस्ता पाहात आहे याचा अंदाज लागत नाही तसेच या ‘किलर रोड’ वरुन जाणाऱ्या स्थानिक तसेच देशी वा परदेशी पर्यटकांना हा मार्ग सुरक्षीत ठरावा अशी प्रशासनानेही उचित पावले उस्रललेली आहेत असे नाही. 13 मे 2014 रोजी आंबोरा येथे झालेल्या अपघातात एकूण तिघेजण जखमी झाली. केए-04-बी-8539 क्रमांकाचा 10 चाके असलेला बेळगाव येथील श्री काली ट्रान्सपोर्टचा ट्रक उलटला. या ट्रकमधून दांडेली येथील एका कारखान्यासाठी लाकडी भूसा नेण्यात येत होता. आंबोरा येथे वळणावर हा ट्रक उलटला. झ्या जगी ट्रक उलटला तेथे असलेल्या भसारी दुकानातून काही ग्राहक सामान खरेदी करण्यासाठी उभे होते. त्यात एक विद्यार्थी होती. मिफा डायस (35) व तिची मुलगी नियोमी (14) सामान खरेदी करण्यासाठी होती. उलटलेल्या ट्रकच्या खाली ही दोघे अडकली. थ्यातील 14 वर्षीय मुलगी नंतर दगावली होती. राय येथे झालेल्या दुसऱ्या एका अपघातात 45 वर्षीय सलीम अन्सारी याना मृत्यू आला हाता. राय येथे झालेल्या दुसऱ्या एका अपघातात सद्दाम हसेन याना मृत्यू आला होता. 18 सप्टेंबर 2006 रोजी आंबोरा -राय येथे केए-28-एफ-1130 क्रमांकाची बस उलटली व त्यात अनेक जण जखमी झाले. पैकी बैलहोंगल येथील एक प्रवासी नाझीर बेपारी यांनी या या एसटी बस महामंडळाविरुद्ध न्यायालयात भरपाईसाठी अर्ज केला होता. याच रस्त्यावर असलेल्या तेंबी येथे नाफ्ता घेऊन जाणारा एक टँकर कोसळला होता आणि मध्यरात्रीच्या सुमाराला वाहात जाणाऱ्या नाफ्ताने पेट घेतला होता. मध्यरात्रीचा या आगीच्या वाहत्या लोळाची अजुनही शेकडो लोकांना आठवण आहे. आणि म्हणून राय-तेंबी-आंबोरा मार्गाला ‘किलर रोड’ म्हणून उपहासाने संबोधले जाते









