दापोली
दापोली शहरातील आसऱ्याच्या पुलावर शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात रस्त्याने चालत जाणाऱ्या दोन २० वर्षीय विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्त्याने चालत जात असताना मागील बाजूने वेगाने येणाऱ्या पुणे येथे पर्यटकाच्या गाडीने त्यांना धडक दिली. यात दोन्ही विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. त्यांना दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे उपजिल्हा रूग्णालयाकडून समोर आले.








