अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट दक्षिण पोलीसांनी सराईत आरोपी सिध्दाराम शिवकरण मंगरूळे यास अटक करून चोरीस गेलेले १२ लाख रूपयाचे २ टॅक्टर जप्त करण्यात आला. गुड्डेवाडी ता. अक्कलकोट येथुन बसणा माळगे यांचा १२ फेब्रुवारी व दुधनी येथुन अमृत खंडाळ यांचा १६ आँगस्ट रोजी ट्रॅक्टर चोरीला गेला होता. त्यानुसार ट्रॅक्टर चोरी झाल्याचा गुन्हा दक्षिण पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
पोलीसाकडून कर्नाटक मधील गुलबर्गा व विजापूर जिल्हयात तपास सुरू असता बातमी मिळाली कि, सिध्दाराम शिवकरण मंगरूळे मुळ रा. गुड्डेवाडी, ता अक्कलकोट सध्या मुर्गानुर, जि. गुलबर्गा हा एक संशयास्पद असलेला टॅक्टर फारच कमी किंमतीमध्ये विक्री करणार असल्याचा सुगावा लागला. हा ट्रॅक्टर विकत घेण्याचा बहाणा करून पोलीसच शिक्षक व व्यापारी बनुन मौजे इंडि, जि. विजापूर येथे जावुन संशयित सिध्दाराम शिवकरण मंगरूळे यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन्ही गुन्हयाचे मिळुन 12 लाख रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी सिध्दाराम शिवकरण हा सराईत गुन्हेगार असुन तो अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातील आणखी दोन गुन्हयामध्ये आरोपी आहे. त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, वाळु चोरी, सरकारी नोकरावर हल्ला, चोरी असे एकुण ११ गुन्हे विविध गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत.