वृत्तसंस्था/ दिल्ली
दिल्लीच्या आरके पुरममध्ये रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दोन बहिणोची गोळ्या घालून हत्या केली आहे. पिंकी (30 वर्षे) आणि ज्योती (29 वर्षे) अशी या मृत महिलांची नावे आहेत. हल्लेखोर पैशांच्या देवाणघेवाणीवरून या महिलांच्या भावाला मारहाण करण्यासाठी आले होते. परंतु घराबाहेर दोन्ही बहिणींवर गोळ्या झाडून फरार झाले आहेत.
गोळी लागल्यावर दोन्ही बहिणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू करत तीन जणांना अटक केली आहे. या आरोपींची आता कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केला आहे. दिल्लीतील लोक आता स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहे. ज्यांच्या हाती कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आहेत, ते दिल्ली सरकारला अस्थिर करण्यात मग्न असल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे. दिल्लीची कायदा-सुव्यवस्था उपराज्यपालांऐवजी दिल्ली सरकारकडे असती तर दिल्ली हे सर्वात सुरक्षित क्षेत्र ठरले असते असा दावाही त्यांनी केला आहे.









