कानपूरमध्ये महापौरांच्या निर्देशानंतर कारवाई : शिवलिंग गायब
वृत्तसंस्था/ कानपूर
उत्तर प्रदेशात कानपूरच्या महापौर व भाजप नेत्या प्रमिला पांडे यांनी अतिक्रमण हटावच्या सूचना केल्यानंतर मुस्लीमबहुल भागातील दोन बंद मंदिरे उघडण्यात आली. 1992 च्या दंगलीनंतर मुस्लीमबहुल भागातील अनेक मंदिरे ताब्यात घेण्यात आली होती. या मंदिरांपैकी दोन मंदिरे उघडली असता त्यातील शिवलिंग गायब असल्याचे आढळून आले. तर अन्य एका मंदिरात छोटा कारखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कानपूरच्या महापौर आणि भाजप नेत्या प्रमिला पांडे अचानक आपल्या संपूर्ण फौजफाट्यासह कर्नलगंज पोलीस स्थानकाच्या लुधौरा भागात पोहोचल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. महापौरांनी परिसरात उपस्थित असलेली दोन्ही मंदिरे खुली करून मंदिरावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. सोबत असलेल्या महापालिकेच्या पथकाला मंदिराच्या आतील व बाहेरील बाजूची स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अयोध्येतही 32 वर्षांनंतर शिवमंदिर उघडले
यापूर्वी अयोध्येतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्लीमबहुल ल•ावाला भागात बंद असलेले शिवमंदिर 32 वर्षांनंतर पुन्हा उघडण्यात आले आहे. 1992 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त बाबरी ढाचा पाडल्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आले होते. यावेळी स्थानिक हिंदू कार्यकर्त्यांनी स्वामी यशवीर महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रार्थना केली आणि श्रद्धेने मंदिरात दर्शन घेतले.









