खेड :
खेड-दापोली मार्गावरील बहिरवली फाट्यानजीक बुधवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात दोघेजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघातात दापोली तालुक्यातील वाकवली येथील अमोल बाबू पवार (४९), विनोद बाबू पवार (२५) हे गंभीररित्या जखमी झाले.
अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचून त्यांनी पंचनामा गेला. अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील खोळंबली होती. ट्रॅक्टरचालक चिंचघर वीजभट्टीवर काम करत असेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पसार चालकाचा येथे स्थानिक पोलिसांकडून शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शिवाय अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.








