वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील सरायकेला-खरसावन येथून टेक ऑफ केल्यानंतर अल्केमिस्ट एव्हिएशन कंपनीचे दोन आसनी विमान बेपत्ता झाले आहे. या विमानाचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली मात्र त्याचा पत्ता लागला नव्हता. विमानाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी चांदिल धरणात विमानाचे अवशेष पाहिल्याचा दावा केला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविली जात असल्याचे सरायकेला-खरसावन विभागाचे पोलीसप्रमुख मुकेश कुमार लुनायत यांनी सांगितले. सोनारी एरोड्रोमच्या हवाई वाहतूक नियंत्रणाने निमडीहजवळ विमानाचे शेवटचे लोकेशन निश्चित केले होते.









