टिळकवाडी काँग्रेस रोडवर घडला प्रकार
बेळगाव : रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या कारला सायकल घासून गेल्याचे निमित्त होऊन शाळकरी मुलांना मारहाण करण्यात आली. सोमवारी दुपारी काँग्रेस रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात गर्दी जमली होती. सोमवारी दुपारी दोन शाळकरी मुले सायकलवरून जात होती. त्यावेळी कारला सायकल घासून कारचे नुकसान झाले. त्यामुळे त्या मुलांना मारहाण करण्यात आली. नंतर स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करीत मुलांना मारहाण करणाऱ्यांना जाब विचारल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्यावरील भांडणानंतर हे प्रकरण टिळकवाडी पोलीस स्थानकापर्यंत पोहोचले. सायंकाळी टिळकवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता यासंबंधी एफआयआर दाखल झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









