आणखी एकाला मोले येथे अटक : दोन पिस्तुलांसह 8 काडतुसे जप्त : रामनगर पोलिसांची कारवाई
वार्ताहर /रामनगर
गोवा येथून कर्नाटकात दरोडा घालण्याच्या दृष्टिकोनातून बसमधून येत असताना अनमोड अबकारी चेक नाक्यावर तपासणी करताना चार युवक जंगलाच्या दिशेने धावत होते. यावेळी मारसंगाळ रेल्वेगेटनजीक गोवर्धन बाबूसिंग राजपूत (वय 29), शामलाल दडपारामजी मेग्वाल जोतपूर (दोघेही रा. राजस्थान) यांना रामनगर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून विनापरवाना दोन पिस्तूल तसेच आठ काडतुसे जप्त केल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. गोवा येथून कर्नाटकात येणाऱ्या बसमध्ये नेहमीप्रमाणे दारू तपासणी करतेवेळी दोन जणांच्या बॅगमध्ये पिस्तूल सापडली. त्यांची चौकशी करतेवेळी इतर दोन जण मोक्याच्या फायदा घेऊन पसार झाले. सदर घटना ताबडतोब गोवा पोलिसांना कळवल्याने मोले येथील चेकनाक्यावर लाडू कुक्का सिंग (वय 22 राहणार राजस्थान) याला अटक करून त्याच्या जवळील एक पिस्तूल, तीन बुलेट जप्त केली.
सदर घटना कळताच कारवारचे
अॅडिशनल एसपी जयकुमार, जोयड्याचे सीपीआय चंद्रशेखर हरिहर, रामनगरचे पीएसआय बसवराज मबनूर तसेच कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक शगुन सावंत, कुळेचे पीएसआय संदीप निंबाळकर यांनी बैठक घेऊन पुढील तपास करत आहेत. यामधील एक आरोपी फरार झाला आहे.
मोले येथे पिस्तुलासह एकाला अटक
कर्नाटक एसटी बसमधून विनापरवाना पिस्तुलास प्रवास करणाऱ्या मूळ राजस्थान येथील एका प्रवाशाला कुळे पोलिसांनी अटक केली. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुळे पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. लाडू सिंग (22) असे संशयिताचे नाव आहे. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायं. 7 वा. सुमारास रामनगर येथून येणाऱ्या बसमधील एका प्रवाशाकडे बेकायदा पिस्तुल असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुळे पोलिसांनी मोले चेक नाक्यावर बसची कसून तपासणी केली. यामध्ये लाडू सिंग (22) याच्याकडे विनापरवाना पिस्तूल सापडले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करून संशयिताला अटक केली. पुढील चौकशीसाठी संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव जल्मी यांनी पंचनामा केला. दरम्यान, संशयिताकडे पिस्तुल व काडतूस सापडल्यामुळे पोलीस खाते सतर्क झाले असून सर्व पोलीस स्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. याप्रकरणी या तिघांही संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे.









