वृत्तसंस्था/ लंडन
भारताचा 19 वर्षांखालील संघ 24 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर पहिला सामना खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी, 19 वर्षांखालील भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान संघातील आदित्य राणा आणि खिलन पटेल हे दोन खेळाडू जखमी झाले आहेत. दुखापतीमुळे दोन्ही खेळाडूं इंग्लंड दौऱ्यातून बाहेर गेले असून त्यांच्या जागी डी दीपेश आणि नमन पुष्पक या दोघांना संधी देण्यात आली आहे. ज्युनियर क्रिकेट समितीने दीपेश आणि नमन दोघांनाही या दौऱ्यासाठी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले होते. दरम्यान, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू असलेल्या कॅम्प दरम्यान आदित्यला पाठीच्या कण्यातील स्ट्रेस फ्रॅक्चर झाला, तर खिलनच्या उजव्या पायात समस्या आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला दोन्ही खेळाडूंच्या बदलीची घोषणा करावी लागली आहे. आता, इंग्लंड दौऱ्यात भारताचे युवा खेळाडू कशी कामगिरी करतात, याची उत्सुकता तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना आहे.
आयुष म्हात्रेकडे नेतृत्वाची धुरा
बीसीसीआयने 22 मे रोजीच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. संघाची कमान मुंबईकर आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली होती, तर आयपीएल 2025 मध्ये फलंदाजीने धुमाकूळ घालणारा वैभव सूर्यवंशी याचाही संघात समावेश करण्यात आला होता. आता दौरा सुरू होण्याच्या काही दिवस आधी संघात बदल करण्यात आला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी युवा भारतीय संघ –
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार), हरवंश सिंग, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, युधावना मोहम्मद, युधावना, प्रमोदकुमार, युवराज सिंह सिंग, डी. दीपेश, नमन पुष्पक.









