लेहला जाणारे इंडिगोचे विमान दिल्लीला परतले ; स्पाइसजेटचे हैदराबाद-तिरुपती विमानही माघारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे विमान 6-ई-2006 हे तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी सकाळी दिल्लीला परतले. सदर विमानात क्रू मेंबर्ससह 180 जण होते. याशिवाय स्पाइसजेटचे विमान एसजी-2696 देखील उड्डाणानंतर 10 मिनिटांनी माघारी परतल्याचा प्रकारही गुरुवारी घडला. हे विमान हैदराबादहून तिरुपतीला जात होते. विमानात एकूण 80 प्रवासी होते. उड्डाणानंतर पायलटला विमानाच्या मागील दरवाजात काही समस्या असल्याचे संकेत मिळाल्यानंतर विमान विमानतळावर परतल्याचे विमान कंपन्यांनी सांगितले. यापूर्वी बुधवारी एअर इंडियाची तीन विमानसेवा रद्द करण्यात आल्या होत्या. यामध्ये दिल्ली-बाली, टोरंटो-दिल्ली आणि दुबई-दिल्ली ड्डाणांचा समावेश होता.









