प्रतिनिधी /बेळगाव
गावठी दारुची वाहतूक करणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. यमकनमर्डी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळय़ा कारवाईत बेकायदा गावठी दारू जप्त केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिले.
दड्डी रोडवरील अलदाळ क्रॉसनजीक सदानंद लक्ष्मण नाईक (वय 33) याला अटक करुन त्याच्याजवळून 60 लीटर गावठी दारू जप्त केली आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेली होंडा शाईन मोटार सायकलही पोलिसांनी जप्त केली असून, दुसरी कारवाई गुटगुद्दीजवळ करण्यात आली आहे.
रामाप्पा लगमाप्पा निंगारी (वय 55) याला अटक करुन त्याच्याजवळून 20 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. यमकनमर्डी पोलीस स्थानकात या दोन्ही प्रकरणांची नोंद झाली आहे.









