कणकवली: वार्ताहर
महामार्गावरून ‘राँग साईड’ने येत असलेल्या दुचाकीची समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक बसली. खारेपाटण येथे उड्डाणपुलावर बुधवारी रात्री ८.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील सचिन एकनाथ लाड (३५) व तानाजी वामन शेळकर (३०, दोन्ही रा. राजापूर, जि. रत्नागिरी) हे मृत्यूमुखी पडले. कंटेनर मुंबईच्या दिशेने तर दुचाकी गोव्याच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे अन्य पोलीस दाखल झाले होते.
Previous Articleसावधान, बँक खाते क्षणात होते साफ!
Next Article ‘ईडी’मार्फत चौकशी नकोच, न्यायालयामार्फतच करावी









